|| गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ||
असे चपखल वर्णन, समर्थ रामदास आपल्या मनाच्या श्लोकामध्ये गणपतीचे करतात. तर असा हा गणांचा पती म्हणून गणपती सर्व देवांमध्ये अग्रपूजेचा अधिकारी आहे. अष्टविनायका व्यतिरिक्त प्रसिद्धीस आलेल्या अनेक मंदिरांपैकी एक मंत्रभूमी नाशिक येथील उपनगर स्थित श्री गणेशाचे इच्छामणी ( सर्व इच्छा पूर्ण करणारे ) मंदिर आहे.