|| ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ||

स्व. चंद्रकांत दादा जोशी महाराज ( धार , मध्यप्रदेश ) यांनी १९८६ रोजी या मंदिरात भगवान गणेशाची स्थापना केली. त्यांना एकूण २१ मंदिरे बांधायची होती त्यांपैकीच हे एक होय. सदर मंदिर हे पूर्णपणे नवीन धाटणीचे असून, मार्बलचा उपयोग करून स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. भगवान गणेश व दोन्ही बाजूला मुख्य मूर्तीपेक्षा लहान अशा रिद्धी सिद्धी, अशी मूर्तीची योजना केली आहे. सभामंडप प्रशस्त आहे